📚📖 *कर्मयोगींचा ज्ञानयज्ञ* 📖📙
📖📙 *ATM शिक्षण संमेलन* 📘📖
*वर्ष २ रे*
👬👬👬👭👭👭👭
📝 *ज्ञानदेव नवसरे ,*
*ATM नाशिक*
*कृतिशील शिक्षक महाराष्ट्र अर्थात Active Teachers Maharashtra ( ATM)* ने दिनांक १५ व १६ मे २०१७ रोजी *दोन दिवसीय राज्यस्तरीय व्दितीय शिक्षण संमेलन* आयोजित करुन महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कृतिशील शिक्षक एकत्र आल्याने तो कर्मयोगींचा ज्ञानयज्ञ ठरला.
या संमेलनाची उपस्थिती हे आमचे भाग्यच.
ATM चे राज्यस्तरीय शिक्षण संमेलन आयोजनात
ATM संयोजक विक्रम अडसूळ सर, ATM औरंगाबाद चे सदस्य मंगलाराम नारायण सर तसेच त्यांना इतर ATM`ians ची उत्कृष्ट साथ त्यांना दिली अन संमेलन यशस्वी संपन्न केलेत, त्याबद्दल प्रथमतः संपूर्ण ATM परिवाराचे खुप खुप अभिनंदन आणि कौतुक💐💐
चातकाने पावसाची वाट पाहावी तशी ATM शिक्षण संमेलनाची वाट पाहणाऱ्या ATM Ian's ची प्रतिक्षा अखेर कोकमठाण शिर्डी या ठिकाणी दिनांक १५ तारखेला संपली.
१४ तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातील कृतिशील शिक्षकांचा मेळा कोकमठाण ला जमू लागला.मंगलाराम सर,विक्रम सर यांनी रात्रभर जागरण करुन सर्वांना रिसिव्ह केल.श्रीकृष्ण सुदामांच्या गाठीभेटी होऊ लागल्या आणि सुरू झाला भव्यदिव्य ज्ञानयज्ञ.
*📝नावनोंदणी*
ATM औरंगाबाद चे सदस्य श्री नारायण मंगलाराम,नवनाथ सुर्यवंशी ,उमेश कोटलवार यांनी नावनोंदणीची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नियोजित वेळेत ATM चा ज्ञान यज्ञ सुरू झाला.
*🔸सूत्रसंचालन*
स्वागत गीत या ने कार्यक्रमाला सुरुवात झाली
स्वागताचा नियोजित कार्यक्रम ATM ठाणेकडे होता.
कलावती पहुरकर,सुचिता अरज प्रेरणा शेलावले यांनी हे सत्र सांभाळले
परंतु स्वागत सोहळा होत असताना एका व्यक्यिमत्वाची कमतरता सतत जाणवत होती अन ते व्यक्तिमत्व म्हणजे *ज्योतिताई बेलवले*
🔸सकाळच्या सत्रातील सुरू झालेल्या सख्यांच्या गाठीभेटी ह्रदयाला प्रेमानं कुरवाळत होत्या.
🔸प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत उद्धाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर
🔸 *रेणुताई दांडेकर* *(भाषा विषय अभ्यासक)*
रेणुताई दांडेकरांनी पहिल्या सत्रात विविध प्रश्न विचारून भाषा विषयातील बारकावे सांगिताना भाषा विषयाचे भव्यदिव्य स्वरूपाचे दर्शन झाले.
🔸 *कला समेकित शिक्षण*
*प्रो.पवन सुधीर HOD कला विभाग,NCERT दिल्ली*
कला विषय आणि मूल समजून घेतानाच
कला विषयाचा इतर विषयाशी प्रभावी समन्वयाबद्दल सांगून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
🔸 *स्मिताताई गालफाडे*
*कविता रसग्रहण*
एका कवितेचे किती वेगवेगळे प्रयोग करता येऊ शकतात हे ताईंकडून समजले.
ताईंचा स्वर आणि गायन काळजाला भिडत होते.
🔸 *प्रकट मुलाखत*
*तृप्ती ताई अंधारे* *(प्रयोगशील गटशिक्षणाधिकारी, लातूर)*
सोमनाथ सर,समाधान सरांनी विविध प्रश्न विचारून तृप्तीताईंची घेतलेली मुलाखत ताईंच्या कामकाजाची भव्यता समोर आणत होती.
एक अधिकारीआणि शिक्षक व विद्यार्थी यांचा योग्य समन्वय ताईंच्या गटात आहे ,ताई आज अधिकारी असल्या तरी त्यांच्यातील शिक्षक आजही शिकत आहे .
🔸ATM औरंगाबाद चे सदस्य मंगलाराम सरांनी पहिल्या दिवसाचे संपुर्ण आभार प्रदर्शन केले.
🔸रात्री ९:०० वाजता सुरू झालेला गप्पा गाणी गोष्टींमुळे ATM ians आनंदाने न्हाऊन निघाले. अलका रसाळ,रोहिणी गव्हाणे ,स्नेहा मगदुम,दिपश्री वाणी,स्नेहल काकडे, अलका शिंदे ,मनीषा पिंगळे या बहिणींनी बानू,म्हाळसा,खंडेरावांचे दर्शन घडवून आणले. वयाची चाळीशी पार करणाऱ्या बहिणींचा उत्साह नवतरुणांना किती ऊर्जा देत असेल याचा अंदाज तुम्ही काढालच.
🔸सोमनाथ वाळके सरांची कराओके गाणी आणि त्यांचा आवाज सभागृहात सर्वांना गुणगुणायला लावत होता.
आंतरराष्ट्रीय स्तरावर ५० देशांमध्ये दाखवलेला सोमनाथ सरांची कथा असणारा *माह्या गुरूजीची गाडी* हा लघुपट पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले.😊
रात्रीचे बारा वाजले तरी खुर्च्या सोडायला तयार नसणारे ATM ians असू शकतात याचा अंदाज पहिल्या दिवशी आला.
दुसरा दिवस उत्साहात सुरू झाला.
🔸 *शाळा समृद्ध करताना*
या विषयावर बोलताना
भरत पाटील,डिगांबर भिसे,पौर्णिमा राणे,अशोक चेपटे, किशोर गर्जे ,अलका रसाळ यांनी त्यांचा कामाचे प्रदर्शन देऊन प्रतिकुल परिस्थितीत उभे केलेले काम सांगितले. कामातील अफाट ऊर्जा ,प्रेरणा, जिद्द, चिकाटी
यांचे प्रदर्शन ATMians चे मन जिंकून घेत होते, टाळ्यांचा कडकडाटात सभागृह दणाणून सोडले.
🔸 *शिष्यवृत्ती परिक्षा एक प्रवास*
*नितीन शेजवळ* या अवलियाच्या दिशादर्शनाच्या मुशीत त्यांच्या शाळेत महाराष्ट्रातील शिष्यवृत्ती नाव गाजवणारे विद्यार्थी घडताना व परीक्षेची तयार होणारे विद्यार्थी याबद्दल उत्कृष्ट सादरीकरण केले.
🔸 *अध्यापन कौशल्य*
*बालसाहित्यिक राजीव तांबे* सरांनी अध्यापनातील कौशल्य,बालकांचे मानसशास्त्र याबद्दल खुप विनोदी शैलीत माहिती सांगून शंकासमाधान केले.
🔸 *इंग्रजी विषय अध्यापन*
वर्षाराणी मुंगसे यांनी इंग्रजी अध्यापनातील बारकावे स्पष्ट करुन सांगितले.
🔸 *गणित समजून घेताना*
मंगला पवार,नागेश चरपेलवार यांनी गणिताचे प्रात्यक्षिक करुन दाखवत गणित संबोध कसे स्पष्ट करावेत याबद्दल माहिती सांगितली.
🔸 *प्रेरणादायी शाळा*
खंडू मोरे सरांची फांगदर शाळेचा वस्तीशाळा ते आय एस ओ ते शाळासिद्धी प्रवास सर्वांच्या मनावर अधिकाराज्य गाजवत होता.
हर्षा चव्हाण यांनी शाळेच्या सादरीकरण सह शिंगापुर दौरा याबद्दल माहिती सांगितले.
मुक्ता पवार यांनी शाळेतील त्यांचे प्रयत्न सांगितले
🔸 *संमेलनातील सर्वांचा उत्साह आणि सादरीकरण पाहता संतोषदा मुसळे यांनी संमेलन तीन दिवसाचे असावे अशी अपेक्षा व्यक्त केली*
🔸ATM संयोजक विक्रम अडसूळ यांनी ATM परिवाराचे पुढील ध्येयधोरणे मांडली व संमेलनाबद्दल आपले मत व्यक्त केले.
🔸 दोन दिवसीय संमेलनात सूत्रसंचालन संजय खाडे सर,गजानन उदार सर,सोमनाथ वाळके सर,संतोषदा मुसळे सर तसेच इतर सहका-यांनी केले.
🔸नारायण सर,तसेच संजय खाडे सर यांनी आभार प्रदर्शन केले.
🔸 *ATM शिक्षण संमेलन २०१७ Special*
🔸 *भरत पाटील* नवतरुण शिक्षकाने दोन दिवसाचे संमेलनातील अपडेट व्हाॅटस् अॅप, फेसबुकच्या माध्यामातुन संपूर्ण महाराष्ट्रभर पोहचले.
🔸 *आंबोली केद्राची यशोगाथा*
शरद तोत्रे व दिपालीताई गिलबिले यांनी HOD कला विभाग NCERT दिल्ली च्या प्रो. पवन मॅम,प्रयोगशील गटशिक्षणाधिकारी तृप्तीताई अंधारे, बालसाहित्यिक राजीव तांबे सर,ATM संयोजक विक्रम अडसूळ सर,प्रयोगशील शिक्षक सोमनाथ वाळके तसेच संतोषदा मुसळे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली केंद्राची यशोगाथेचे प्रकाशन करून यशोगाथेचे वाटत केले. यशोगाथेसाठी त्यांचे अभिनंदन💐
🔸 *प्रकाश चव्हाण*
नाशिक जिल्ह्यातील चिरतरुण तंत्रस्नेही शिक्षक श्री प्रकाशदा चव्हाण हे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक मुलाखतीसाठी पुण्याला जाणार होते त्यामुळे त्यांचे प्रकाशनासाठीचे साहित्य नाशिक टीमचे गजानन उदार सर यांच्याकडे दिले होते .त्यांनी स्वनिर्मित तयार केलेले इयत्ता १ ते ५ वी च्या व्हिडिओ, १ ते ५ च्या कोण होईल विजेता ? या apps चे ATM संयोजक विक्रम अडसूळ सर प्रकाश चव्हाण या अवलियाबद्दल भरभरुन कौतुक करत मान्यवरांच्या हस्ते अनावरण करत सर्वांसाठी खुले केले तसेच चव्हाण सरांनी उदार सरांच्या मार्फत ATM परिवारातील सर्वांना QR. कोड च्या प्रिंटच्या माध्यमातून सर्वांना पाठवले होते,त्याबद्दल चव्हाण सरांचे खुप खुप अभिनंदन💐
🔸 *माळीनगर एक प्रेरक*
माळीनगर शाळेतील मानसी, हर्षल ,निशा,व त्यांचे पालक संमेलनात आकर्षणाचा भाग ठरले .
हर्षल ला पवन मॅम ने इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नांचीउत्तरे हर्षल ने आत्मविश्वासपुर्वक सांगितली.
हर्षल ,निशा ,मानसी यांच्या स्वनिर्मित साहित्यांचे वाटप सर्वांना करण्यात आले.
या लेकरांना आदरणीय पवन मॅम, तृप्तीताईंनी प्रेमाने कवटाळत मुलांच्या सह्या घेतल्या .तसेच भरतचेही खुप कौतुक केले.
🔸 *भिका जावरे जळगाव* यांच्या
पडद्याआडचा बाप या
चारोळी संग्रह चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
🙏
🔸 *ATM प्रयोगशाळा*
गेल्या वर्षी संमेलनात संजय टिकारिया सरांनी ATM सदस्यांची ATM प्रयोगशाळा ही संकल्पना मांडली होती अनेक सद्स्यांनी सुरु ही केल्यात ,यावर्षी
पुणे जिल्हा विज्ञान मंडळाचे सदस्य
रोहिदास एकाड,रावसाहेब चौधरी यांनी ATM सदस्यांसाठि प्रयोगशाळेचे सादरीकरण करत ATM प्रयोगशाळा दिली. अनेक सदस्यांना प्रत्यक्ष वापर करून समजावुन सांगितले .ब-यांच बांधवांनी प्रयोगशाळेचे साहित्य घेऊन गेलेत व ATM प्रयोगशाळा सुरू करणार आहेत.
जे बांधव साहित्य घेऊन जायचे विसरले आहेत त्यांना पुढील संमेलनात साहित्य दिले जाणार आहे.
🔸 *झाशीची राणी*
प्रतिभाताई लोखंडे यांनी झांशी ची राणी पात्र केले होते.
🔸 *ATM कविता*
भारत लाड, अशोक चेपटे,काशिनाथ सोलनकर यांनी कविता गायन केले.
🔸 *ATM जळगाव*
मनीषा पिंगळे,पौर्णिमा राणे,अरुणा उदावंत, प्रतिभा बडगुजर व भरत पाटील यांनी ATM वर आधारित मनीषा पिंगळे हिने स्वरचित केलेल्या ओव्यांचे गायन केले या मध्ये विक्रम सर व ATM चा महिमा वर्णिला होता.
🔸 *ATM ians ला ई साहित्य भेट*
चाणक्य स्टडी.काॅम चे संचालक सुरेंद्र शिंदे सर व सेल्स मॅनेजर सागर गाडे सर यांनी सर्व शाळांना इयत्ता १ली ते ८ वी पर्यंत दोन महिन्याच्या फ्री ट्रायलचे साहित्य भेट स्वरूप दिले आहे.
🔸 *हे संम्मेलन महाराष्ट्राच्या इतिहासातील ऐतिहासिक संमेलन होते कारण या संमेलनासाठी अवघ्या सव्वा महिन्याचे बाळ घेऊन आलेली नंदुरबार येथील भगिनी सविता पारखे..तर वयाची 58 वर्ष पूर्ण केलेल्या व सेवानिवृत्त झालेल्या ठाणे येथील शारदाताई कंठे..*या दोघींची उपस्थिती म्हणजे सर्व काही होते.
किती आत्मीयता प्रेम आपलेपणा ATM परिवाराने निर्माण केलाय याची क्षणोक्षणी प्रचिती येत होती.
🔸 कोपरगावचे शिक्षक आपले मित्र नवनाथ सुर्यवंशी सरांनी संमेलन आयोजनात साहित्यांच्या बाबतीत खुप मदत झाली.
😌 *निरोप*
शेवटी निरोप घेताना पप्रत्येक जण एकमेकांच्या गळ्यात मिठी मारून पानावल्या डोळ्यांनी निरोप घेत होता.तर काहीजण हुंदके देऊन रडताना मी पाहिले..
काय म्हणायचे याला..
किती प्रेम ,जिव्हाळा,आपलेपणा या परिवाराने तयार केला आहे याची प्रचिती येत होती
प्रत्येक जण एकमेकाना पोहचल्यावर फोन करा असे सांगत होता.
धन्यवाद🙏🏻
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


No comments:
Post a Comment