Friday, August 25, 2017

माझी शाळा

16

ज्ञानरचनावाद राबवताना...

ज्ञानरचनावाद राबवताना.....

आज मितीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्ञानरचावाद शैक्षणिक क्षेत्रात रुजला आहे परंतु अजुनहीआमचा शिक्षक गोंधळलेला दिसून येतो

सर्वात प्रथम रचनावाद म्हणजे काय हे आपण समजून घेतले पाहिजे रचनावाद म्हणजे अस काही मोठ्ठ शास्त्र नाही की जे आपणाला वापरता येणारच नाही.रचनावादाची अगदी सोपी व्याख्या करायला गेल्यास असे म्हणता येईल

✒बालकांना फुलण्यासाठी, आत्मविष्कारासाठी अनुकूल,पूरक परिस्थिती निर्माण करून देणं म्हणजेच ज्ञानरचनावाद होय.

किंवा याहून सोपे

✒रचनावाद म्हणजे--कृतिशील स्वयंअध्ययन
यात सर्वात प्रथम स्वयंअध्ययन म्हणजे मुलं आपलं आपण शिकणार,ते त्याच स्वतः शिकणार शिक्षकाने फक्त शिकण्यास मदत करणे

आणि कृतिशील म्हणजे--
आता या कृतीशीलतेमध्ये
1)शारीरिक कृती
2)साधनं वापरून करावयाची कृती
3)वैचारिक पातळीवर जाण्यासाठी करावी लागणारी कृती
यांचा समावेश करता येईल

जर आपणाला या दोन गोष्टी समजल्या तर आपण रचनावाद चांगल्या प्रकारे राबवू शकतो असे मला वाटत

प्रत्येक शिक्षकाने सर्वात प्रथम हे जाणले पाहिजे कि आपण जे शिक्षण देणार आहोत ते  आपल्या वर्गातील मुलांच्या भावी काळासाठी असावं
आज आपल्या समोर शिकणारे विद्यार्थी हे उद्या देशाचे नागरिक होणार आहेत त्यामुळे त्यांना योग्य असे व भावी काळासाठी किफायतशीर असेच शिक्षण दिले पाहिजे.
आज शिकणाऱ्या मुलांना त्यांचे पुढील भावी जीवन जगण्यासाठी व त्याच्या भावी काळासाठी फायद्याचं ठरणार शिक्षण आपण दिले पाहीजे

वर्गामध्ये अध्यापन करत असताना
एक सुलभक म्हणून शिक्षकाने मुलांच्या भावी काळाच्या गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत
त्याच बरोबर भावी काळातील गरजांचा विचार करणे गरजेचे असते
सध्याच्या वेगाने बदलत्या काळामध्ये टिकायचे असेल तर आज आपण दिलेले ज्ञान हे उद्याच्या पिढीच्या कामाला येणार असावं

आता सर्वात महत्वाच्या आणि मेंन मुद्द्याकडे आपण पाहूया

वर्गामध्ये ज्ञानरचनावाद प्रभावीपणे राबवत असताना शिक्षकाने खालील गोष्टींचा विचार करावा.
🔷काय द्यायचं ?
🔷कसं द्यायचं ?
🔷किती द्यायचं ?
🔷गरजा नुसार त्यांना काय हवंय ?

रचनावाद प्रभावीपणे राबविण्यासाठी पुर्वज्ञान जागृत करुन त्याची सांगड नवीन ज्ञानाशी घडवून कृती केली पाहिजे.
आशयानुरुप कृती मुलांना दिल्यास मुले कृतीत रमतात..चुकतात..पुन्हा प्रयत्न करतात आणि ज्ञान मिळवतात त्यामुळे हे ज्ञान घोकंपट्टीयुक्त नसते.ते  ज्ञान चिरकाल स्मरणात राहते.रचनावादात मुल स्वतः  विचार करतं.कृती करतं..व नवीन ज्ञानाची निर्मीती करते.

उदा...जैवविविधतेसाठी आपण
🐂🐟🐅🐄🐪🐫🐘 वेगवेगळे प्राणी व त्यातील फरक
एकच प्राणी व त्यातील फरक
उदा.मासा...🐋🐳🐬🐡🐟🐠

माशांची एकच जात व त्यातील फरक...यात आकार...रंग..इ.
बाबतची विविधता आपण प्रत्यक्ष क्षेत्रभेटीद्वारे किंवा प्रत्यक्ष वस्तू दाखवून मुले त्यातील साम्य भेद निरीक्षणाने रचनावादात अभ्यासतात.

तसेच विविध संकल्पना समजण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष अनुभव देऊन,त्यांच्यासमोर आव्हाने निर्माण करून त्यांची उत्तरे त्यांनाच शोधण्यास प्रवृत्त करणे.

परंतु आजकाल फरशीवर आकृत्या काढल्या म्हणजे शाळेत रचनावादी शिक्षण दिलं जातं असा गोड गैरसमज आमच्या शिक्षक आणि अधिकारी यांच्यामध्ये आपणाला दिसून येतो.
परंतु रचनावादी शिक्षणामध्ये मुलाकडे असणाऱ्या ज्ञानाची सांगड घालायची असते ,मुल आपलं आपण शिकत असत
उदा--मुलांना मापन येत असते
मूल शाळेत येण्याअगोदरच  विविध वस्तू ,नाणी -नोटा ,अंतर याचे मापन करत असते,गणितातील बेरीज शिकवत असताना त्याला एकक दशक संकल्पना स्पष्ट झाल्या की ते बेरीज अगदी सफाईदार पणे करते.
वर्गात मुलांना संपूर्ण स्वातंत्र दिले तर मुले चुकत चुकत शिकत असतात आणि वारंवार कृती केल्यामुळे मुलाने आत्मसात केलेले ज्ञान चिरकाल टिकणारे असते
भाषा विषयाचा विचार करायला गेल्यास-------
मुलांना कोणतीही एक भाषा परिपूर्ण आली पाहिजे कारण मुलांचं 8 ते 10 वय हे भाषा शिकण्याचा काळ असतो असे मानसशास्त्र म्हणते आणि मुलाची पहिली भाषा म्हणजे मातृभाषा ही विचार करण्याची क्षमता विकसित करीत असते.
मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव दिला पाहिजे त्याला वेगवेगळ्या विषयावर कल्पना करायला चालना दिली पाहिजे मग तो विषय कोणताही असो.

उदा- दगडांचा पाऊस पडला तर....

आता तुम्ही म्हणाल हा असला कसला विषय ????
पण मुलांना कल्पना करू द्या
कारण मुलांच्या कल्पना ह्या रबरासारख्या असतात. जेवढ्या ताणाव्या तेवढ्या ताणल्या जातात.यामुळे त्याच्या भावविश्वाचा शोध घेता येतो,त्याच्या मनातील कल्पना समजण्यास मदत होते..

आपल्या वर्गामध्ये प्रभावी ज्ञानरचनावाद राबवत असतांना जर आपण मुलांचा विचार करून त्यांना वेगवेगळ्या कृती करू दिल्या पाहिजेत जेणेकरून मुल आपलं आपण शिकेल व व आपले अध्यापन ही रचनावादी होईल.

        विक्रम अडसूळ
     कर्जत अहमदनगर

जिल्हा परिषद रेहकुरी शाळेस पालकांकडून झेरॉक्स मशीन भेट

Tuesday, June 13, 2017

📚📖 *कर्मयोगींचा ज्ञानयज्ञ* 📖📙

📖📙 *ATM शिक्षण संमेलन* 📘📖
              *वर्ष २ रे*
       👬👬👬👭👭👭👭
📝   *ज्ञानदेव नवसरे ,*
         *ATM नाशिक*

*कृतिशील शिक्षक महाराष्ट्र अर्थात Active Teachers Maharashtra ( ATM)* ने दिनांक १५ व १६ मे २०१७ रोजी *दोन दिवसीय राज्यस्तरीय व्दितीय शिक्षण  संमेलन* आयोजित करुन महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील  कृतिशील शिक्षक एकत्र आल्याने तो कर्मयोगींचा ज्ञानयज्ञ ठरला.
या संमेलनाची उपस्थिती हे आमचे भाग्यच.

ATM चे राज्यस्तरीय शिक्षण संमेलन आयोजनात
ATM संयोजक विक्रम अडसूळ सर, ATM औरंगाबाद चे सदस्य मंगलाराम नारायण सर तसेच त्यांना इतर ATM`ians ची उत्कृष्ट साथ त्यांना दिली अन संमेलन यशस्वी संपन्न केलेत, त्याबद्दल प्रथमतः संपूर्ण  ATM परिवाराचे खुप खुप अभिनंदन आणि कौतुक💐💐

चातकाने पावसाची वाट पाहावी तशी ATM शिक्षण संमेलनाची वाट पाहणाऱ्या ATM Ian's ची प्रतिक्षा अखेर कोकमठाण शिर्डी या ठिकाणी दिनांक १५ तारखेला संपली.
१४ तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातील कृतिशील शिक्षकांचा मेळा कोकमठाण ला जमू लागला.मंगलाराम सर,विक्रम सर यांनी रात्रभर जागरण करुन सर्वांना रिसिव्ह केल.श्रीकृष्ण सुदामांच्या गाठीभेटी होऊ लागल्या आणि सुरू झाला भव्यदिव्य ज्ञानयज्ञ.

*📝नावनोंदणी*
ATM औरंगाबाद चे सदस्य श्री नारायण मंगलाराम,नवनाथ सुर्यवंशी ,उमेश कोटलवार यांनी नावनोंदणीची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नियोजित वेळेत ATM चा ज्ञान यज्ञ सुरू झाला.

*🔸सूत्रसंचालन*
स्वागत गीत या ने कार्यक्रमाला सुरुवात झाली
स्वागताचा  नियोजित कार्यक्रम ATM ठाणेकडे होता.
कलावती पहुरकर,सुचिता अरज प्रेरणा शेलावले यांनी हे सत्र सांभाळले
परंतु स्वागत सोहळा होत असताना एका व्यक्यिमत्वाची कमतरता सतत जाणवत होती अन ते व्यक्तिमत्व म्हणजे *ज्योतिताई बेलवले*

🔸सकाळच्या सत्रातील सुरू झालेल्या सख्यांच्या गाठीभेटी ह्रदयाला प्रेमानं कुरवाळत होत्या.
🔸प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत उद्धाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर
 🔸 *रेणुताई दांडेकर* *(भाषा विषय अभ्यासक)*
रेणुताई दांडेकरांनी पहिल्या सत्रात विविध प्रश्न विचारून भाषा विषयातील बारकावे सांगिताना भाषा विषयाचे भव्यदिव्य स्वरूपाचे दर्शन झाले.
🔸 *कला समेकित शिक्षण*
*प्रो.पवन सुधीर HOD कला विभाग,NCERT दिल्ली*
कला विषय आणि मूल समजून घेतानाच
कला विषयाचा इतर विषयाशी प्रभावी समन्वयाबद्दल सांगून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
🔸 *स्मिताताई गालफाडे*
*कविता रसग्रहण*
एका कवितेचे किती वेगवेगळे प्रयोग करता येऊ शकतात हे ताईंकडून समजले.
ताईंचा स्वर आणि गायन काळजाला भिडत होते.
🔸 *प्रकट मुलाखत*
*तृप्ती ताई अंधारे* *(प्रयोगशील गटशिक्षणाधिकारी, लातूर)*

सोमनाथ  सर,समाधान सरांनी विविध प्रश्न विचारून तृप्तीताईंची  घेतलेली मुलाखत ताईंच्या कामकाजाची भव्यता समोर आणत होती.
एक अधिकारीआणि शिक्षक व विद्यार्थी यांचा योग्य समन्वय ताईंच्या गटात आहे ,ताई आज अधिकारी असल्या तरी त्यांच्यातील शिक्षक आजही शिकत आहे .
🔸ATM औरंगाबाद चे सदस्य मंगलाराम सरांनी पहिल्या दिवसाचे संपुर्ण आभार प्रदर्शन केले.
🔸रात्री ९:०० वाजता सुरू झालेला गप्पा गाणी गोष्टींमुळे ATM ians  आनंदाने न्हाऊन निघाले. अलका रसाळ,रोहिणी गव्हाणे ,स्नेहा मगदुम,दिपश्री वाणी,स्नेहल काकडे, अलका शिंदे ,मनीषा पिंगळे या बहिणींनी बानू,म्हाळसा,खंडेरावांचे दर्शन घडवून आणले. वयाची चाळीशी पार करणाऱ्या बहिणींचा उत्साह नवतरुणांना किती ऊर्जा देत असेल याचा अंदाज तुम्ही काढालच.
🔸सोमनाथ वाळके सरांची कराओके गाणी आणि त्यांचा आवाज सभागृहात सर्वांना गुणगुणायला लावत होता.
आंतरराष्ट्रीय स्तरावर ५० देशांमध्ये दाखवलेला सोमनाथ सरांची कथा असणारा *माह्या गुरूजीची गाडी* हा लघुपट पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले.😊
रात्रीचे बारा वाजले तरी खुर्च्या सोडायला तयार नसणारे ATM ians असू शकतात याचा अंदाज पहिल्या दिवशी आला.

दुसरा दिवस उत्साहात सुरू झाला.
🔸 *शाळा समृद्ध करताना*
या विषयावर बोलताना
भरत पाटील,डिगांबर भिसे,पौर्णिमा राणे,अशोक चेपटे, किशोर गर्जे ,अलका रसाळ यांनी त्यांचा कामाचे प्रदर्शन देऊन प्रतिकुल परिस्थितीत उभे केलेले काम सांगितले. कामातील  अफाट ऊर्जा ,प्रेरणा, जिद्द, चिकाटी
 यांचे प्रदर्शन ATMians चे मन जिंकून घेत होते, टाळ्यांचा कडकडाटात सभागृह दणाणून सोडले.
🔸 *शिष्यवृत्ती परिक्षा एक प्रवास*
*नितीन शेजवळ* या अवलियाच्या दिशादर्शनाच्या मुशीत त्यांच्या शाळेत महाराष्ट्रातील शिष्यवृत्ती नाव गाजवणारे विद्यार्थी घडताना व  परीक्षेची तयार होणारे विद्यार्थी याबद्दल उत्कृष्ट सादरीकरण केले.
🔸 *अध्यापन कौशल्य*
*बालसाहित्यिक राजीव तांबे* सरांनी अध्यापनातील कौशल्य,बालकांचे मानसशास्त्र याबद्दल खुप विनोदी शैलीत माहिती सांगून शंकासमाधान केले.
🔸 *इंग्रजी विषय अध्यापन*
वर्षाराणी मुंगसे यांनी इंग्रजी अध्यापनातील बारकावे स्पष्ट करुन सांगितले.

🔸 *गणित समजून घेताना*
मंगला पवार,नागेश चरपेलवार यांनी गणिताचे प्रात्यक्षिक करुन दाखवत गणित संबोध कसे स्पष्ट करावेत याबद्दल माहिती सांगितली.

🔸 *प्रेरणादायी शाळा*
खंडू मोरे सरांची फांगदर शाळेचा वस्तीशाळा ते आय एस ओ ते शाळासिद्धी प्रवास सर्वांच्या मनावर अधिकाराज्य गाजवत होता.
हर्षा चव्हाण यांनी शाळेच्या सादरीकरण सह शिंगापुर दौरा याबद्दल माहिती सांगितले.
 मुक्ता पवार यांनी शाळेतील त्यांचे प्रयत्न सांगितले
🔸 *संमेलनातील सर्वांचा उत्साह आणि सादरीकरण पाहता संतोषदा मुसळे यांनी संमेलन तीन दिवसाचे असावे अशी अपेक्षा व्यक्त केली*
🔸ATM संयोजक विक्रम अडसूळ यांनी ATM परिवाराचे पुढील ध्येयधोरणे मांडली व संमेलनाबद्दल आपले मत व्यक्त केले.
🔸 दोन दिवसीय संमेलनात सूत्रसंचालन संजय खाडे सर,गजानन उदार सर,सोमनाथ वाळके सर,संतोषदा मुसळे सर तसेच इतर सहका-यांनी केले.
🔸नारायण सर,तसेच संजय खाडे सर यांनी आभार प्रदर्शन केले.

🔸 *ATM शिक्षण संमेलन २०१७ Special*

🔸 *भरत पाटील* नवतरुण शिक्षकाने दोन दिवसाचे संमेलनातील अपडेट व्हाॅटस् अॅप, फेसबुकच्या माध्यामातुन संपूर्ण महाराष्ट्रभर पोहचले.

🔸 *आंबोली केद्राची यशोगाथा*
शरद तोत्रे व दिपालीताई गिलबिले यांनी HOD कला विभाग NCERT दिल्ली च्या प्रो. पवन मॅम,प्रयोगशील गटशिक्षणाधिकारी तृप्तीताई अंधारे, बालसाहित्यिक राजीव तांबे सर,ATM संयोजक विक्रम अडसूळ सर,प्रयोगशील शिक्षक सोमनाथ वाळके तसेच संतोषदा मुसळे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली केंद्राची यशोगाथेचे प्रकाशन करून यशोगाथेचे वाटत केले. यशोगाथेसाठी त्यांचे अभिनंदन💐

🔸 *प्रकाश चव्हाण*
नाशिक जिल्ह्यातील चिरतरुण तंत्रस्नेही शिक्षक श्री प्रकाशदा चव्हाण हे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक मुलाखतीसाठी पुण्याला जाणार होते त्यामुळे त्यांचे प्रकाशनासाठीचे  साहित्य नाशिक टीमचे  गजानन उदार सर यांच्याकडे दिले होते .त्यांनी स्वनिर्मित तयार केलेले इयत्ता १ ते ५ वी च्या व्हिडिओ, १ ते ५ च्या कोण होईल विजेता ? या apps चे ATM संयोजक विक्रम अडसूळ सर प्रकाश चव्हाण या अवलियाबद्दल भरभरुन कौतुक करत मान्यवरांच्या हस्ते अनावरण करत सर्वांसाठी खुले केले तसेच चव्हाण सरांनी उदार सरांच्या मार्फत ATM परिवारातील सर्वांना QR. कोड च्या प्रिंटच्या माध्यमातून सर्वांना पाठवले होते,त्याबद्दल चव्हाण सरांचे खुप खुप अभिनंदन💐

🔸 *माळीनगर एक प्रेरक*
माळीनगर शाळेतील मानसी, हर्षल ,निशा,व त्यांचे पालक संमेलनात आकर्षणाचा भाग ठरले .
हर्षल ला पवन मॅम ने इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नांचीउत्तरे हर्षल ने आत्मविश्वासपुर्वक सांगितली.
हर्षल ,निशा ,मानसी यांच्या स्वनिर्मित साहित्यांचे वाटप सर्वांना करण्यात आले.
या लेकरांना आदरणीय पवन मॅम, तृप्तीताईंनी प्रेमाने कवटाळत मुलांच्या सह्या घेतल्या .तसेच भरतचेही खुप कौतुक केले.

🔸 *भिका जावरे जळगाव* यांच्या
पडद्याआडचा बाप या
चारोळी संग्रह चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
🙏
🔸 *ATM प्रयोगशाळा*
गेल्या वर्षी  संमेलनात संजय टिकारिया सरांनी ATM सदस्यांची ATM प्रयोगशाळा ही संकल्पना मांडली होती अनेक सद्स्यांनी सुरु ही केल्यात ,यावर्षी
पुणे जिल्हा विज्ञान मंडळाचे सदस्य
रोहिदास एकाड,रावसाहेब चौधरी यांनी ATM सदस्यांसाठि प्रयोगशाळेचे सादरीकरण करत ATM प्रयोगशाळा दिली. अनेक सदस्यांना प्रत्यक्ष वापर करून समजावुन सांगितले .ब-यांच बांधवांनी प्रयोगशाळेचे साहित्य घेऊन गेलेत व ATM प्रयोगशाळा सुरू करणार आहेत.
जे बांधव साहित्य घेऊन जायचे विसरले आहेत त्यांना पुढील संमेलनात साहित्य दिले जाणार आहे.
🔸 *झाशीची राणी*
प्रतिभाताई लोखंडे यांनी झांशी ची राणी पात्र केले होते.

🔸 *ATM कविता*
भारत लाड, अशोक चेपटे,काशिनाथ सोलनकर  यांनी कविता गायन केले.

🔸 *ATM जळगाव*
मनीषा पिंगळे,पौर्णिमा राणे,अरुणा उदावंत, प्रतिभा बडगुजर व भरत  पाटील यांनी ATM वर आधारित मनीषा पिंगळे हिने स्वरचित केलेल्या ओव्यांचे गायन केले या मध्ये विक्रम सर व ATM चा महिमा वर्णिला होता.

🔸 *ATM ians ला ई साहित्य भेट*
चाणक्य स्टडी.काॅम चे संचालक सुरेंद्र शिंदे सर व सेल्स मॅनेजर सागर गाडे सर यांनी सर्व शाळांना इयत्ता १ली  ते ८ वी  पर्यंत दोन महिन्याच्या फ्री ट्रायलचे साहित्य भेट स्वरूप दिले आहे.

🔸 *हे संम्मेलन महाराष्ट्राच्या इतिहासातील  ऐतिहासिक संमेलन होते कारण या संमेलनासाठी अवघ्या सव्वा महिन्याचे बाळ घेऊन आलेली नंदुरबार येथील भगिनी सविता पारखे..तर वयाची 58 वर्ष पूर्ण केलेल्या व सेवानिवृत्त झालेल्या ठाणे येथील शारदाताई कंठे..*या दोघींची उपस्थिती म्हणजे सर्व काही होते.
किती आत्मीयता प्रेम आपलेपणा ATM परिवाराने  निर्माण केलाय याची क्षणोक्षणी प्रचिती येत होती.

🔸 कोपरगावचे शिक्षक आपले मित्र नवनाथ सुर्यवंशी सरांनी संमेलन आयोजनात साहित्यांच्या बाबतीत खुप मदत झाली.

😌 *निरोप*
शेवटी निरोप घेताना पप्रत्येक जण एकमेकांच्या गळ्यात मिठी मारून पानावल्या डोळ्यांनी निरोप घेत होता.तर काहीजण हुंदके देऊन रडताना मी पाहिले..
काय म्हणायचे याला..
किती प्रेम ,जिव्हाळा,आपलेपणा या परिवाराने तयार केला आहे याची प्रचिती येत होती
प्रत्येक जण एकमेकाना पोहचल्यावर फोन करा असे सांगत होता.
धन्यवाद🙏🏻
             🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Saturday, October 8, 2016

फडक्यातली भाकरी

फडक्यातली भाकरी...

*फडक्यातील भाकरी*
🍪🍪🍪🍪🍪🍪

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

काल दुपारची जेवणाची सुट्टी.
आम्ही नेहमीप्रमाणे सर्व मुले व मी एकत्र शाळेच्या व्हरांड्यात जेवणासाठी बसलो होतो.सर्वांनी आपापला डबा उघडून जेवायला सुरुवात केली सोबत पोषण आहार ही होता
चौथीच्या वर्गातील प्रतिक्षाने डब्यात बाजरीची भाकरी आणलेली पण ती जेवणा डब्याशी कसलीतरी झटापट चालू होती तिची ..
मी न राहवून विचारले काय झाले मग तिच्या शेजारी बसलेल्या दीपाली ने सांगितले
*सर ...*
*तिच्या डब्यातून भाकरी निगत नाय..*
मग मी म्हणालो बघू मी काढून देतो ..मलाही डब्यातील भाकरी निघेना...😔😔
कारण ही तसेच होते
भाकरी डब्यात इतकी फिट्ट बसली होती की हाताने निघेना
मग आम्ही शाळेतील भातवडीचा वापर करून डब्यातील भाकरी काढली..
मला ही बाजरीची भाकरी पाहून खाण्याचा मोह आवरला नाही. कारण ही तसेच..
 सध्या खरिपाची पिके निघाली आहेत नवीन बाजरी झाली आहे ..अन मीठ टाकून बनवलेली बाजरीची खाण्यात मजा काही औरच असते.
मग आमच्या बाजरीच्या भाकरीवर खूप गप्पा झाल्या.
भाकरी कशी बनवली पाहिजे,भाकरीसोबत काय छान लागते...असे बरेच काही..
मी काल बोलता बोलता बोलून गेलो होतो की डब्यात भाकरी कडक राहत नाही ती चिकटते या साठी फडक्यात बांधून आणलेली भाकरी कडक राहते व चवीला हि छान लागते..
*मी लहान असताना माझी आई मला फडक्यात भाकरी बांधून द्यायची असं खूप काही बोललो*
*लहानपणीच्या माझ्या बालआठवणी जेवण करताना मुलांना सांगितल्या*

*अन आज.....*

दुपारी जेवणाची सुट्टी झाली मी प्रश्नार्थी  शब्द हे शैक्षणिक साहित्य बनवत होतो काम चालूच होते.मुलांना जेवायला बसा सांगितले मी येतोच असं म्हणून.पण कामामुळे 5 मिनिट झाले तरी लक्षात नाही आले की जेवायचे

दीपाली दरवाज्यापाशी घुटमळत होती म्हणून मी तिला थोडं मोठ्या आवाजतच बोललो ..
जा बस कि जेवायला ...
पण ती जाईना..
मग मी विचारले का जेवणास तेव्हा तिने जे उत्तर दिले त्या उत्तराने माझ्या हातातील काम आपोआप बंद पडले आणि मी खुर्चीवरून ताडकन उठलो....
माहितेय तिने काय सांगितले

*स चला ना जेवायला*
*मी फडक्यात बाजरीची अन मिरचीची ठेचा आणलाय..*

खरच क्षणभर विचारात पडलो
लेकरं किती जीव लावतात आपल्याला,
किती प्रेम करतात,
किती आत्मीयता असते मुलांची आपल्याशी,
क्षणभर तृप्तीताई समोर उभ्या राहिल्या अन त्यांचा शब्द आठवला ....
*सर्वात प्रथम प्रत्येक शिक्षकाने मूल समजून घेतले पाहिजे*
खरंच मूले फार जीव लावतात आपल्याला..

*आजचे जेवण खरच इतके चविष्ट होते की पंचपक्वांन ही या माझ्या दीपालीने  आणलेल्या फडक्यातील भाकरीपुढे फिके ठरले असते*

आजचा दिवस खूप काही  शिकवून गेला
🙏🙏🙏🙏🙏

कर्जत तालुकास्तरीय शिक्षण परिषद

कर्जत तालुकास्तरीय शिक्षण परिषद

*शिक्षण परिषद*
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर केंद्र स्तरावर शिक्षण परिषद घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने घेतला आहे.त्याचाच एक भाग म्हणून आज *दि.17 सप्टेंबर 2016 रोजी अहमदनगर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी मा. अशोक कडूस साहेब तसेच उपशिक्षणाधिकारी अंकुश जंजिरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील केंद्र स्तरावरील शिक्षण परिषद पार पडल्या.*
*याचाच एक भाग म्हणून कर्जत तालुक्यातील सर्व केंद्रातील शिक्षण परिषद मा. गटशिक्षणाधिकारी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या.*
या परिषदेमध्ये केंद्रातील ज्या शिक्षकांचे प्रगत वर्ग आहेत,प्रगत शाळा  आहेत ,तसेच ज्या शिक्षकांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे अश्या शिक्षकांनी आपल्या शाळेचे सादरीकरण व्हिडीओ,पीपीटी यांच्या साहाय्याने केले.यावेळी सम्पूर्ण वातावरण सकारात्मक झालेलं दिसून आले.

*राशिन केंद्राच्या परिषदेमध्ये आदरणीय शिक्षण आयुक्त मा. धीरज कुमार साहेब व मा. शिक्षण सचिव नंदकुमार साहेब यांनी मोबाईल फोन वरून शिक्षकांशी संवाद साधला व एकंदरीत परीषदेचा  आढावा घेतला .आदरणीय साहेबांच्या या फोन संदेशा मुळे प्रत्येक शिक्षकाच्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे दिसून येत होते.*

*यानंतर कोरेगाव केंद्रातील शिक्षण परिषदेमध्ये महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी असणारा ..स्फूर्तीचा अखंड झरा..आधुनिक सावित्रीमाई लातूरच्या गटशिक्षणाधिकारी आदरणीय मा.तृप्ती अंधारे यांनी फोन द्वावारे शिक्षकांशी संवाद साधला.*एकंदरीतच आज संपूर्ण कर्जत तालुका शिक्षणमय झालेला दिसून आला.
प्रत्येक शिक्षक आपण करत असलेले काम इतरांना समजून सांगत होता,आपल्या यशाचे गमक सांगत होता,तसेच स्वतः ची शाळा प्रगत करण्यासाठी ,समृद्ध करण्यासाठी कोणत्या अडचणी आल्या हे हि सांगत होता.यातून प्रत्येक  शिक्षकाला नवीन दिशा मिळत होती.
आज एकंदरीतच प्रत्येक शिक्षक माझ्या शाळेतील प्रत्येक मुल शिकलं पाहिजे यासाठी काय करता येईल हे एकमेकांना सांगत होता

आजचे आदरणीय मान्यवरांचे फोनवरील मार्गदर्शन,शिक्षकांशी साधलेला संवाद खूपच प्रेरणादायी ,सकारात्मक ऊर्जा देऊन गेला.

आजची ही शिक्षण परिषद पार पाडण्यासाठी तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख,विस्तार अधिकारी,उपक्रमशील शिक्षक व कर्जत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. शिंदे साहेब या सर्वांनी परिश्रम घेतले

*मी एक शिक्षक म्हणून मला काही केंद्रामध्ये माझ्या शाळेचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली ,माझ्या शाळेचे काम मला सादर करता आले हे मी माझे भाग्य समजतो.*

खरच केंद्र स्तरावरील शिक्षण परिषदेचे आयोजन हा शासनाने घेतलेला स्तुत्य उपक्रम... असेच मी तर माझ्या शब्दात वर्णन करेल...
🙏🙏🙏🙏🙏

*विक्रम अडसूळ*
*कर्जत ,अहमदनगर*

*9923715464*

💐💐💐💐💐💐